फडणवीस मुख्यमंत्रीपदी असते तर….कंगणाने पुन्हा साधला महाविकास आघाडीवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येपासून बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत भलतीच आक्रमक झाली आहे. त्यातच मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिने राज्यातील सरकार वर टीका करताना थेट शिवसेनेलाच लक्ष्य केले.त्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना हा वाद पेटतच चालला आहे.त्यातच महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली.

इतकंच नव्हे तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता असा सूर तिनं ट्विच्या माध्यमातून आळवला.

राज्यात सध्या सत्तेत असणाऱी भ्रष्ट सोनिया सेना जी माफियांना पाठिशी घालते, त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांनी त्यांचं काम योग्य मार्गानं केलं असतं. नागरिक आणि जनतेला त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता’, असं तिनं लिहिलं. कंगनाचं हे ट्विट पाहता आता तिला नेमकं कोण आणि काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like