गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट सुरू केले ;पण….राज्यपाल-ठाकरे वादात कंगनाची उडी

kangana and uddhav thakarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं तसेच उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. बार सुरू झाले, हॉटेल सुरू झाले मग देवच कुलूपबंद का ?? असा सवाल राज्यपालांनी ठाकरे सरकारला विचारला होता. भाजपने मंदिरांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होत. त्यातच आता कंगना राणावतने राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार या वादात उडी घेतली असून ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे.

“माननीय राज्यपालांनी गुंड सरकारला प्रश्न विचारला हे ऐकून छान वाटलं, गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट सुरू केले पण रणनीती नुसार मंदिरे बंद केली.सोनिया सेना ही बाबर सेने पेक्षा वाईट वागणूक देत आहे”.अस ट्विट कंगणाने केलं आहे.

कंगना राणावत आणि शिवसेना हा वाद नवा नाही.यापूर्वीही कंगणाने वेगवेगळ्या मुद्द्यावरन ठाकरे सरकारवर टीका केली होती.सुशांत आत्महत्या प्रकरणापासून कंगना वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य करत सरकारवर  निशाणा साधायची एकही संधी सोडत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’