हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वादग्रस्त विधानाने सातत्याने चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने आता खलिस्तानवाद्यांवरून नवी पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच तिने कृषी कायद्यावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले आहे. यावेळी तीने इंदिरा गांधी यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
कंगना रनौतने फेसबुकवर हि पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, खलिस्तानी दहशतवादी आज आपल्या सरकारचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करत आहे….पण एका महिलेला विसरू नका… या एकमेव महिला पंतप्रधानांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडलं होते….. त्यांनी (खलिस्तानी) या देशाला कितीही त्रास दिला असला तरी ….. त्यांनी (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) जीवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले आहे…. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत….त्यांच्या मृत्यूनंतरही…. आजही त्यांच्या नावाने हे प्रकरण ओळखले जाते… त्याला एकच गुरू आहे… #repeaalfarmlaws… खलिस्तानी चळवळीच्या उदयाप्रमाणे त्यांची कहाणीदेखील नेहमीपेक्षा अधिक समर्पक झाली आहे…..खूप लवकरच तुमच्यासाठी #Emergency आणत आहे.
आता कंगनाची हि समर्पक पोस्ट पाहता तिने कृषी कायद्यांच्या मुद्द्याला लांब दाखवून जवळून हात घातला आहे का काय? असे वाटते आहे. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केलेला कौतुकाचा वर्षाव शेतकऱ्यांच्या मुद्द्यात काँग्रेसला अप्रत्यक्षपणे भूमिका घ्या असे कंगनाला सांगायचे आहे का काय? असेही वाटत आहे. कारण अलीकडेच कंगनाने तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत तिने व्यक्त होताना लिहिले होते कि, “दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचं आहे… संसदेत बसणाऱ्या सरकारऐवजी आता रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागलेत, तर हाही जिहादी देश आहे… अभिनंदन. जे हे सर्व करु इच्छितात.