हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे माजी कर्णधार असलेल्या Kapil Dev यांच्याकडून नुकतेच भारताच्या तीन मोठ्या फलंदाजांवर टीका करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी म्हटले की,”आता रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलमध्ये यांना आपल्या T-20 मधील खेळाबाबतचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.” त्यांनी पुढे सांगितले कि यंदाचा T-20 विश्वचषक हा ऑस्ट्रेलियामध्ये असणार आहे, जर यावेळी भारताला ट्रॉफी जिंकायची असेल तर रोहित आणि कोहलीला चांगला खेळ करावा लागेल.
युट्यूब चॅनल अनकटशी बोलताना Kapil Dev म्हणाले कि,”रोहित आणि विराटवर सध्या खूप दबाव आहे. त्यांनी फार विचार न करता बिनधास्तपणे खेळ करावा.” कपिल देव पुढे म्हणाले कि, “हे सर्व 150-160 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करू शकणारे खेळाडू आहेत. मात्र जेव्हा धावा करण्याची गरज असते तेव्हा ते सर्व (रोहित, विराट, केएल राहुल) लवकर बाद होत आहेत. यामुळे संघावरील दबाव वाढतो, त्यामुळे एकतर तुम्ही अँकर म्हणून नाहीतर स्ट्रायकर म्हणून खेळा.”
केएल राहुलबाबत Kapil Dev म्हणाले कि,”केएल राहुलला जर संघाने पूर्ण 20 षटके फलंदाजी करायला सांगितले तर तो नाबाद धावा करून परतेल मते हे योग्य नाही. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.” या मुलाखतीत कपिल यांनी पुढे सांगितले की,” केवळ मोठी प्रतिष्ठाच पुरेशी नाही. मोठ्या खेळाडूचा प्रभावही मोठा असतो. यामुळे मोठ्या खेळाडूंनाही चांगली कामगिरी करावी लागते.”
हे लक्षात घ्या कि, भारतीय संघाची भिस्त असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा दीर्घकाळापासून खराब फॉर्ममधून जात आहेत. आयपीएलमध्येही या दोन्ही फलंदाजांना काही खास कामगिरी आलेली नाही. मात्र केएल राहुलने जरी या आयपीएलमध्ये काही मोठ्या खेळी केल्या असल्या तरीही या दोघानांही चांगल्या सुरुवाती नंतर मोठ्या धावा करण्यात अपयश आले.
हे पण वाचा :
Business Idea : अशा प्रकारे फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे !!!
Gold Price Today : सोने-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
PM KISAN : 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ??? यामागील कारणे जाणून घ्या
EPF कि NPS यापैकी रिटायरमेंटसाठी कोणती योजना चांगली आहे हे समजून घ्या