कपिल सिब्बल यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच घेरलं; कोर्टात नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडलं. मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडलं आणि यासाठी राज्यपालांची मदत घेण्यात आली असा मोठा दावा त्यांनी केला. बेईमानीचे बक्षीस म्हणूनच शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं असंही त्यांनी म्हंटल.

बेईमानीचे बक्षीस म्हणूनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. 40 आमदार राज्यपालांकडे येतात आणि मुख्यमंत्र्यांना पाठिंबा नाही म्हणतात आणि राज्यपाल थेट बहुमत चाचणीची मागणी करतात. इथे लोकशाहीची तत्व कुठे आहेत?? उद्या समजा भाजपचे 50 आमदार उद्धव ठाकरेंकडे गेले तर तेव्हा सुद्धा राज्यपाल असाच निर्णय देतील का ? असा थेट सवाल कपिल सिब्बल यांनी केला.

ते पुढे म्हणाले, त्यांनी युक्तिवाद केला व्हीप फक्त सभागृहातच बजावला जाऊ शकतो. मग जर सभागृहाबाहेर व्हीप काम करू शकत नाही तर मग ते आसाममध्ये काय करत होते? तुम्ही आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसला आहात आणि तुम्ही एका अशा प्रतोदला पदावरून दूर करत आहात जो राजकीय पक्षाने नियुक्त केला होता अस म्हणत सिब्बल यांनी शिंदे गटाला कोंडीत पकडले.

दरम्यान, देशातील लोकशाही सध्या धोक्यात आहे. या न्यायालयानं जर मध्यस्थी केली नाही, तर आपली लोकशाही धोक्यात येईल. कारण असं झाल्यास कोणतंच सरकार अशा प्रकारे टिकू दिलं जाणार नाही त्यामुळे आता जो निर्णय येईल तो देशातील लोकशाहीचं भविष्य ठरवणारा असेल, असे भावनिक विधान करत सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाचा शेवट केला.