कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड बाजार समिती निवडणूकीत सत्ताधारी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर गट आघाडीने आजच आपलं खात खोलले आहे. आजच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काका- बाबा गटाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. हमाल – मापाडी गटातून वसंतगड गावचे गणपत आबासो पाटील असे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे नांव आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक सध्या जोरदार चर्चेत आहे. आज सोमवारी दिनांक 3 रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली. यंदाची बाजार समितीची निवडणूक अत्यंत चर्चेची होणार असून यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांना कराड उत्तर येथील भाजपचे नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांनी उपस्थित रहात, साथ दिली आहे. तर माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे प्रदेश कार्यकारणी सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत काका पाटील यांनीही सोसायटी गटातून अर्ज दाखल केला.
उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे सेनापती!! 'त्या' खास खुर्चीने वेधले लक्ष्य
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/45i2q2tGXa#Hellomaharashtra @ShivSenaUBT_ @OfficeofUT
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 3, 2023
कराड बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. मात्र यादरम्यान, हमाल व मापाडी गटातून सत्ताधारी काका- बाबा गटातून गणपत आबासो पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती काका- बाबा गटाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आजच काका बाबा गटाने विजयी सुरुवात केली आहे.