उदयसिंह पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीत वाढ

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। कराड दक्षिण मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचे चित्र आता समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. उदयसिंह यांनी आज कोणतेही शक्ती प्रर्दशन न करता यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करुन पाटील यांनी अर्ज आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या अडचणीत वाढल्याचे दिसत आहेत.

कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सध्या परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण व विलास काका उंडाळकर असे काँग्रेसचे दोन गट येथे अस्तित्वात आहेत. या दोघांतील अंतर्गत विरोध पाहता त्यांचे मनोमिलन होणे तसे कठीणच होते. त्यातच उदयसिंग यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचे आता स्पष्ट झाल्यानंतर, काँग्रेस गटाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

याचा फायदा भाजपकडून कराड दक्षिण मधून उभे राहिलेले अतुल भोसले यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्ती प्रदर्शनात पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मध्ये ही निवडणूक सोपी जाणार नाही, असे वाटत असताना उदयसिंह यांच्या रूपाने पृथीवराज चव्हाण यांच्या समोर कराडची जागा जिंकणे आता आव्हानात्मक बनले आहे.