हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Karnataka Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. 29 सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आता ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.25 टक्के ते जास्तीत जास्त 6.40 टक्के व्याज दिले जाईल.
आता Karnataka Bank कडून 1-2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त व्याजदर दिला जाईल. त्याच वेळी, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज दिला जातो आहे. मात्र हा बदल आरबीआयने रेपो दरात वाढ करण्यापूर्वीचे केला गेलेला आहे. यापुढे बँकेकडून FD वरील व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्त्य देखील आहे.
कर्नाटक बँकेचे FD वरील नवीन व्याज दर
आता Karnataka Bank कडून 7 ते 90 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याज देत आहे. ग्राहकांना 91-364 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याज देखील मिळेल. बँक 1-2 वर्षांच्या FD वर सर्वाधिक 6.40 टक्के व्याज देत आहे. यानंतर, बँक 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत आणि 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.75 टक्के वार्षिक व्याज देईल. हे 5 ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 5.80 टक्के व्याज देत आहे. हे लक्षात घ्या कि. हे व्याज दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिट्सवर लागू असतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज दर
Karnataka Bank च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल. तसेच आता बँक 1-2 वर्षांच्या FD वर 6.80 टक्के, 2-5 वर्षांच्या एफडीवर 6.15 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.30 टक्के व्याज देईल. ज्येष्ठ नागरिकांना प्रदीर्घ कालावधीसाठी साध्या व्याजदरापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याजदर मिळेल.
RBI ने केली रेपो दरात वाढ
हे लक्षात घ्या कि, 30 सप्टेंबर रोजी RBI कडून रेपो दरात पुन्हा एकदा वाढ केली गेली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या 3 दिवसीय बैठकीनंतर, RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदरात 0.50 टक्के वाढ केल्याची घोषणा केली आहे. सलग चार वेळा दर वाढ झाल्याने रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. ज्यामुळे बँकांकडून कर्ज आणि एफडीवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. Karnataka Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://karnatakabank.com/personal/term-deposits/interest-rates
हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 11,000% रिटर्न
ICICI Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर तपासा
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Bank FD : 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकांच्या FD होणार बंद, त्याविषयी जाणून घ्या
आता WhatsApp द्वारे कळू शकेल ट्रेनचे लाइव्ह स्टेटस, त्यासाठीची प्रक्रिया तपासा