सांगली प्रतिनिधी । ‘राष्ट्रवादी व काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यानेच त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची चहापेक्षा किटली गरम झाली असल्या सारखी आहे. अशी टीका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी सांगली येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केली. दरम्यान सौदी यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, ‘राष्ट्रवादी व काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यानेच त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची चहापेक्षा किटली गरम झाली आहे. मोदी आल्यापासून देशात अनेक आमूलाग्र बदल झाले. सर्वसामान्यांचा भाजपवर असणारा विश्वास अधिक दृढ होतो आहे.
मोदी व फडणवीस यांनी पारदर्शक कमला अधिक महत्व दिले. रस्त्याच्या विकासासाठी १ लाख ६० हजार कोटी दिले. कर्नाटकातील शेतकरी सांगलीच्या बाजारपेठेत येत असतात. महाराष्ट्र व कर्नाटक आणि आंध्र या राज्यांना कृष्णा नदीच्या पाण्याची खूप मोठी अडचण होत आहे. कर्नाटकने अलमट्टीची उंची वाढविलेली नाही असे सांगून यावेळी सुधीरदादांना गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन केले.