हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Karur Vysya Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Karur Vysya Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
10 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Karur Vysya Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 10 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता ग्राहकांना बँक 7 दिवसांपासून ते 6 वर्षांवरील मुदतीच्या FD वर सर्वसामान्यांना 4.00 टक्के ते 6.25 टक्के व्याजदर देत आहे. करूर वैश्य बँक आता 555 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याजदर देईल.
Karur Vysya Bank च्या एफडीचे नवीन दर
करूर वैश्य बँकेच्या म्हणण्यानुसार, बँक आता 7 दिवस ते 30 दिवसांच्या FD वर 4.00% व्याजदर आणि 31 दिवस ते 120 दिवसांच्या FD वर 5.25% व्याजदर देईल. 121 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर आता 5.50% व्याज मिळेल, तर 181 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर आता 6.00% व्याज मिळेल.
1 वर्ष ते 554 दिवसांच्या FD वर बँक आता 6.50% व्याजदर देईल आणि 555 दिवसांच्या FD वर, बँक आता 7.25% व्याज दर देईल. तसेच बँक आता 556 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.50% व्याज दर देत आहे आणि 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या FD वर, बँक आता 7.00% व्याजदर देईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Karur Vysya Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://bandhanbank.com/rates-charges
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा