अकोला प्रतिनिधी । शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.
यावेळी त्यांनी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. कलाम ३७० वरून त्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर दिले. महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथून कोणत्या जावानाने काश्मीरच्या शांततेसाठी बलिदान दिले नसेल. महाराष्ट्रातील जवानांनी काश्मीरमध्ये शत्रूंशी निकराचा लढा दिला. कारण त्यांना माहिती होतं आपण शिवाजी महाराज्यांच्या राज्यातून आलो आहोत. या विश्वासानीच त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन बलिदान दिले.
आम्हाला राज्यातील या जवानांच्या बलिदानाचा अभिमान आहे. मात्र, आज केवळ आपल्या कुटुंबाचे पोषण करणारे राज्यातील लोक विचारतात की, राज्याचा जम्मू-काश्मीरशी संबंध काय? असा प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या विधानावर लाज वाटायला हवी” असेही मोदी विरोधकांवर टीका करत यावेळी बोलले.