हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीचा लिव ईन रिलेशनशिपमधील पार्टनर आफताब पुनावाला याने खून केला. त्यानंतर त्याअनुषंगाने पोलिसांकडून पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अशातच भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांने या हत्याकांड प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “शिकलेल्या मुलीच लिव इन रिलेशनशिपचा शिकार होतात, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हंटले आहे.
केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना एक वादग्रस्त विधान केले. “या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, त्या चांगल्या शिकलेल्या आहेत. ज्या मुलींना असं वाटतं की आपण आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो, ती क्षमता आपल्यात आहे, असं वाटणाऱ्या मुलींसोबत असे प्रकार घडत आहेत.
अनेक लोक लिव ईन रिलेशनशिपमध्ये का राहतायत? त्यांना तसं राहायचं असेल तर त्याची नोंदही कुठेतरी घेतली गेली पाहिजे. जर अशा व्यक्तींच्या पालकांना त्याचं नात सार्वजनिक जीवनात अमान्य असेल, तर अशा जोडप्यांनी कोर्टात जाऊन लग्न करावं आणि मग एकत्र राहावं.
शिकलेल्या मुलींनी अशा प्रकारचं नातं जोडू नये. शिकलेल्या मुली आई वडिलांची मर्जी नाकारुन असा निर्णय घेत असतील तर या प्रकारांसाठी त्या स्वतः जबाबदार आहेत. शिकलेल्या मुलींनी नेमकं असं त्या का करत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. दरम्यान, केंद्रीय मंत्र्याने केलेल्या केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र संपात व्यक्त केला आहे.