खा. अमोल कोल्हे राष्ट्रवादी सोडणार?; नाराजीची होतेय चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीयमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेच्या शिर्डी येथील शिबिरासही गैरहजेरी लावली होती. त्यामुळे अमोल कोल्हे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

खा. अमोल कोल्हे गेल्या तीन वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात वेळ देत नसल्याने याबाबत मतदारसंघातीलच राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे. अमोल कोल्हे हे खासदार असले तरीही ते आधी सेलिब्रिटी आहेत. मात्र, त्यांच्याकडून अलीकडच्या काळात पक्षाच्या कार्यक्रमांनाही गैरहजेरी लावली जात आहे.

राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मंथन शिबिरातही कोल्हे यांनी गैरहजेरी लावली होती. तसेच दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या नेत्यांची नावे आहेत. परंतु अमोल कोल्हेंचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याबाबत पक्षातील नेत्यांचाही नाराजीचा सुरु उमटत आहे.

नाराजीबाबत कोल्हे म्हणाले?

नाराजीच्या चर्चेबाबत अनिल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे कोणतेही कारण नाही. नाराज असतो तर थेट शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्याशी बोललो असतो. त्यामुळे मी पक्षात नाराज नसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचा अमोल कोल्हेंनी खुलासा केला आहे.