हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारावरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल,” अशी टीका शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
केदार शिंदे यांनी ट्विट करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, “वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! लोकशाही,”असे शिंदे यांनी म्हंटले आहे.
वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! #लोकशाही
— 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) February 5, 2022
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.