फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये जोरदार हाणामारी

Football World Cup
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या कतारमध्ये फुटबॉल (Football) वर्ल्डकप सुरू आहे. यावेळी या फिफा वर्ल्डकप 2022 मधील अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन संघांच्या मॅचवरून (Football) चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाली. केरळमध्ये हि घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
केरळमध्ये शक्तिकुलंगरा ग्रामीण येथे अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या समर्थकांनी (Football) दोन स्वतंत्र रोड शो आयोजीत केले होते.यादरम्यान या दोन्ही रोड शो चे सदस्य एकमेकांसमोर आले आणि जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या हाणामारी प्रकरणी केरळ पोलिसांनी कोल्लममधील शक्तिकुलंगरा पोलीस ठाण्यात आयपीसी 160 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

कुठे बघाल फिफा वर्ल्डकप 2022?
भारतात फिफा वर्ल्डकप 2022 प्रसारित करण्याचे अधिकार वायकॉम-18 यांच्याकडे आहेत. त्यामुळे फुटबॉल वर्ल्डकपच्या (Football) मॅच स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 HD या दोन टीव्ही चॅनलवर बघता येणार आहे. तसेच Voot Select आणि JIO TV वर लाइव्ह स्ट्रीमिंग बघता येणार आहे.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..