हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडले. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. “शेतकऱ्यांसाठी पैसे नाही पण आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी, वा रे वा ठाकरे सरकार,” अशा शब्दांत उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी नुकतेच ट्वीट करत ठाकरे सरकारने कालच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे ठाकरे सरकार,” अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
तसेच एसटी कामगाराच्या आत्महत्येवरूनही उपाध्ये यांनी टीका केली असून त्यांनी “एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या पण तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
अतिवृष्टी,अवकाळी पाऊस,गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायलापैसा नाही.पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान.वा रे @OfficeofUT सरकार.
अनियमित बांधकामे करा फक्त शिवसेनेचे आमदार की तुम्हाला सगळ माफ हेच @OfficeofUT सरकारच धोरण 3/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 13, 2022
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान. वा रे ठाकरे सरकार.अनियमित बांधकामे करा फक्त शिवसेनेचे आमदार की तुम्हाला सगळ माफ हेच ठाकरे सरकारचे धोरण, अशीति टीका उपाध्ये यांनी केली आहे.