आज १२ डिसेंबर रोजी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला खडसे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून पंकजा मुंडेही मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविणायत येत आहे.
दरम्यान या मेळाव्यापूर्वी खडसेंनी गोपुईनाथ मुंडेंच्या आठवणीला उजाळा दिला आहे. या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना आहे. निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यामागे राजकारण होते. रोहिनी खडसे तिकीट मागत नव्हत्या, तरीही दिले. अपमानास्पद वागून दिली जाते, हा विश्वासघात आहे. आधी असे राजकारणात होत नव्हते. गोपीनाथ मुंडे असते तर ही आली वेळ नसती. अशा शब्दात खडसेंनी आपली खंत व्यक्त केली आहे.
तसेच आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी दिल्ली दरबारी गेलेल्या खडसेंना पक्ष नेतृत्वाने भेट नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या लागोपाठ भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही.