टीम, HELLO महाराष्ट्र । शिरुड गावाजवळ स्कुल बस चालकाला बंदुकीचा धाक दाखवत लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने केला. चालकाचे प्रसंगावधानामुळे तो प्रयत्न फसला. या घटनेने धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली .
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , शहरापासुन २२ कि.मी.अतंरावर असलेल्या शिरुड गावाजवळ शाळेत जाणाऱ्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न अज्ञात दोन व्यक्तींनी केला. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे तो प्रयत्न फसला . नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी सात वाजता शिरुडहुन प्रिन्स मुकेश पाटील वय वर्ष 6 या पहिलीत शिकणारा विद्यार्थी धुळे येथील गुरुद्वारा जवळील एस. व्ही. के. शाळेकडे व्हँगेनार गाडीत चालकासह धुळेकडे येताना शिरुड गावापुढे रस्त्यावर दोन अज्ञात इसमानी व्हँगेनार गाडी क्रं.एम एच 18 ए जी 5619 ला हात दाखवून थांबविले. आमचे मोटरसायकल मधील पेट्रोल संपले आहे. आम्हाला पेट्रोल पंपा पर्यत सोड असा बहाणा केला . चालकाने सहमती दर्शवली .यावेळी दोघापैकी एक व्यक्ती गाडीत बसला गाडी काही अतंर दुरवर आली असता त्या अज्ञात इसमाने चालकाला पाठिमागुन बंदुक लावली व धमकावले की , गाडी व मुलाला इथे सोड तु निघुन जा.गाडी चालकाने प्रसंगावधान राखत त्या अज्ञात व्यक्तीला बोलताना सांगितले की तु गाडीचे चालक सिटावर पुढे येऊन बस हे सांगताच अज्ञात व्यक्तीने होकारा दिला . चालक गाडीतून खाली उतरला व त्याचे सिट कडिल दार उघडले. व चटकन त्याला जोरदारपणे रस्त्यावर ढकले . तो अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या बाजुला पडला.व तेथुन तो शेतात पळुन गेला.
नंतर सदर बाब हि मुलाचे वडिल डॉक्टर मुकेश वामनराव पाटील यांना सांगितली, ते हि क्षणभर घाबरले दिसले. मी तालुका पोलीस स्टेशनला आलो आहे.चालकाने सांगितले तुम्ही हि तिथे या. डॉ. पाटील लगेचच काही वेळात तालुका पोलीस स्टेशनला आले. मुलाला पाहुन त्यांचा जिव भांड्यात पडला आपला मुलगा सुखरुप आहे.त्याला काही झाले नाही.याबद्दल चालकाचे डॉक्टर पाटील यांनी कौतुक केले.
चालकाने घडलेला प्रकार डॉक्टर व ग्रामिण उपविभागिय अधिकारी श्रीकांत घुमरे,तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांचे समोर सांगितला पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे नाका बंदी करत दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांचा शोध घेत आहे. दुपारी उशीरा पर्यत तालुका पोलीस स्टेशनला अपहरण गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.