खळबळजनक !! पैसे मागितल्याच्या कारणावरुन कोयत्याने खुनी हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

शामरावनगर मध्ये एक हजार रुपये मागितल्याचा कारणातून एकमेकांकडे बघितल्याने एकावर कोयता आणि काठीने खुनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी स्वराज्य चौक येथे रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात अमरीश बबनराव सनगर हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद सनगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गोट्या उर्फ मेघश्याम अशोक जाधव, वैभव सदाशिव माळी, आकाश रामलाल सादवाणी, रोहित सुरेश कांबळे, हेमंत सुरेश इंगवले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी मेघश्याम जाधव याच्याकडे सनगर याने एक हजार रुपये मागितले होते. शुक्रवारी रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या बुलेट गाडीवरून घरी निघाले होते. त्याचवेळी चौघे जण स्वराज्य चौक येथे थांबले होते. त्यावेळी सनगर याने गोट्या उर्फ मेघश्याम जाधव कुठे आहे अशी चौघांकडे विचारणा केली. त्यावेळी जाधव हा त्याठिकाणी आला. दोघांमध्ये एकमेकांकडे रागाने बघितल्याचा कारणातून वाद सुरु झाला.

वाद विकोपाला गेल्यानंतर पाच जणांनी सनगर याला धक्काबुक्की करत बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता आणि काठीने त्याच्यावर खुनी हल्ला करत त्याला जखमी केले. यावेळी त्याचा मोबाईल फोडून त्याच्या बुलेट गाडीवर दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment