हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा फोटो सोशल मीडियावर टाकत एकेरी शब्दांत जोरदार टीका केली आहे. या टीकेला सोमय्या यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ” राऊत माझ्याबाबतच्या पुराव्याचा एकही कागद देऊ शकत नाही. आणि आपण आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. विक्रांत प्रकरणी आम्ही एक दमडीचाही घोटाळा केला नाही, त्यामुळे कोणाला घाबरण्याचे काही कारण नाही, असे सोमय्या यांनी म्हंटले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी राऊत यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत. मात्र, राऊत माझ्याबाबतच्या पुराव्याचा एकही कागद देऊ शकत नाही. तसेच आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. विक्रांत प्रकरणी आम्ही एक दमडीचाही घोटाळा केला नाही, त्यामुळे कोणाला घाबरण्याचे काही कारण नाही.
काय केला आहे संजय राऊत यांनी आरोप?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सोमय्या यांच्यावर आरोप केला. त्यामध्ये आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले असून यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात होता. सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेतेदेखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच आज फेसबुक पोस्टद्वारेही त्यांनी आणखी एक आरोप केला.
राऊत यांनी फेसबुक पोस्ट द्वारे म्हंटल की, आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करुन जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेट्यांना तुरुंगामध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे,” असा टोला लगावलाय. त्याचप्रमाणे, “लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचारावाच लागेल,” असंही राऊत यांनी म्हटलंय.