हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात आहे अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला.
सोमय्या म्हणाले, आंबेमातेकडे मी प्रार्थना केली आहे की मातेनं त्यावेळी राक्षसाचा वध केला होता. आत्ता महाराष्ट्राला भ्रष्टाचाररुपी एक शाप मिळालाय, भ्रष्टाचाराचा राक्षस तयार झाला आहे, त्याचा वध करण्यासाठी मला शक्ती दे. असे सोमय्यांनी म्हंटल.
सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. घोटाळे उघड करणं आपलं काम आहे. असेही ते म्हणाले.