औरंगाबाद | दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने धावत असणाऱ्या किसान रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांना वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल्वे चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस दिनांक ५ जानेवारीला नगरसोल येथून सोडण्यात आली.
नांदेड रेल्वे विभागातील नगरसोल येथून ३१ जानेवारी पर्यंत ३३ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. या ३३ किसान रेल्वे मधून १३ हजार ६५८ टन कांदा पाठविण्यात आला. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, अगरतला आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे देखील किसान रेल्वे ला प्रतिसाद मिळाला आणि शेतकरी, व्यापारीवर्गाला फायदा व्हावा यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने शेतकरी आणि व्यापारी वर्गाला रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांना वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेचा लाभ शेतकरी आणि व्यापारी वर्गाने घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाचे सावट असल्याने आधीच रेल्वेला ब्रेक लागले होते. त्यामुळे रेल्वे विभागाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या बऱ्याच रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मालवाहतूक करण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातून जानेवारी महिन्यात ३३ किसान रेल्वे धावल्या आहे. त्यात मालवाहतुक मोठ्या प्रमाणात झाली. यातून रेल्वेला जवळपास ६ कोटी ५८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”