शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुलेंची हकालपट्टी; संघटनेत फुट पडणार काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांनी ही घोषणा एका व्हिडीओ मार्फत केलेली आहे. दरम्यान शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद यानिमित्ताने समोर आला असून याची परिणीती संघटनेच्या फुटीत होणार काय? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी एक व्हिडीओ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पाठवून कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवण्यात आले असून त्यांच्याशी संघटनेविषयी संबंध ठेवू नये, असे त्रोटक निवेदन त्यांनी केले आहे.

याबाबत नितीन चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संघटनेतून आपल्याला का काढले? याचे कारण देण्यात आलेले नाही. हा संदेश व्हिडीओमधूनच मला समजला. दोनच दिवसांपूर्वी आपण हिंदूंना सडलेला समाज म्हटलेल्या शरजील उस्मानी विरोधात व एल्गार परिषदेच्याविरोधात आंदोलन केले होते. ते कुणाला झोंबले काय? किंवा त्यांचे समर्थक शिवप्रतिष्ठानमध्ये आहेत का? याचा शोध घ्यावा लागेल, असा टोला लगावला.

दरम्यान, शिवप्रतिष्ठानमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मतभेदांची कुजबूज सुरु होती. शिवप्रतिष्ठानच्या खासगी बैठकीमध्ये नितीन चौगुले व काहीजणांचा वाद झाल्याचेही वृत्त होते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी या विषयाबाबत चर्चाही केली होती. पण या वादाची परिणीती अखेर नितीन चौगुले यांच्या हकालपट्टीत झाली. आता संघटनेतील अंतर्गत राजकारणावर मोठा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment