हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kitchen Tips – आपण दैनंदिन जीवनात भांडी घासण्यासाठी स्पंज आणि स्क्रबरचा वापर करत असतो. पण हाच स्पंज आणि स्क्रबर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो. यावर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले होते कि यापासून खरच आजार होतात का ?… यासाठी एक संशोधन करण्यात आलं आणि त्यावरून स्पष्ट झालं कि , याच्या वापरामुळे विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर घरात स्पंज आणि स्क्रबरचा वापर करत असाल , तर हि बातमी तुमच्या कुटुंबासाठी अन आरोग्यसाठी महत्वाची ठरणार आहे.
हानिकारक बॅक्टेरियांची वाढ (Kitchen Tips) –
स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या स्पंज आणि स्क्रबमध्ये जास्त वेळ ओले राहिल्यास आणि अन्नाचे छोटे कण अडकून राहिल्यास, हानिकारक बॅक्टेरियांची वाढ होते . विशेषत: त्यामध्ये साल्मोनेला, ई. कोली, आणि स्टेफिलोकोकस सारख्या बॅक्टेरिया आढळू शकतात. या बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंग, पोटाच्या समस्या, जळजळ, त्वचेवरील जळजळ किंवा पुरळ , उलट्या किंवा अतिसार , ताप, फंगल इन्फेक्शन आणि श्वसनाच्या समस्या होऊ शकतात.
आवश्यक काळजी घावी –
स्वयंपाकघरातील स्पंज आणि स्क्रब नियमितपणे स्वच्छ धून ठेवणे आवश्यक आहे.
स्पंज वाळवणे आणि ओलसर ठिकाणांपासून ठेवावेत.
स्पंज दर दोन ते तीन आठवड्यांनी गरजेचे आहे.
स्वयंपाकघरात वापरले जाणारे स्पंज आपल्याला जरी स्वच्छ (Kitchen Tips) दिसत असले तरी, त्यावर असलेल्या हानिकारक बॅक्टेरियामुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा योग्य वापर आणि नियमित बदल अत्यंत महत्त्वाचा आहे.







