सलग पाचव्या वर्षी KL Rahul ची कमाल, ‘हा’ रेकॉड करणारा ठरला पहिला भारतीय

KL Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – केएल राहुलने (KL Rahul) बुधवारी सलग पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये 500 धावांचा टप्पा पार केला. या कामगिरीसह, सलग पाचव्या आयपीएल मोसमात 500 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. नवी मुंबईतील डॉ. डी.वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात केएल राहुलने (KL Rahul) ही कामगिरी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने हा केकेआरवर 2 धावांनी मात हा सामना जिंकला आहे. या विजयाबरोबरच ते प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत.

राहुलनं आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील 14 सामन्यात 537 रन केले आहेत. त्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सोडल्यापासून राहुल फॉर्मात आहे. त्यानं पंजाब किंग्जकडून 2018 साली पहिल्या सिझनमध्ये 659 रन केले. त्यानंतर 2019 साली 593 रन काढले. 2020 साली 670 तर 2021 साली 626 रन केले आहेत. केएल राहुलनं यंदाच्या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून दमदार कामगिरी केली. त्यानं मुंबई इंडियन्स विरूद्ध दोन शतकं झळकावली आहेत.

कालच्या सामन्यात क्विंटन डिकॉकने वादळी शतक झळकावले. डिकॉकने 70 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 140 रन केले. त्याच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता, तसंच केएल राहुलने 51 बॉलमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली. डिकॉक आणि केएल राहुलच्या (KL Rahul) या फटकेबाजीमुळे लखनऊने 20 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 210 रन केल्या आहेत. आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशीप ठरली आहे. तसंच आयपीएलच्या 15 मोसमांमध्ये पहिल्यांदाच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने एकही विकेट गमावली नाही.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल