अयोध्येत येणाऱ्या राज ठाकरेंना रोखून तर दाखवा… ; साध्वी कांचनगिरी यांचे थेट मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून 5 जून रोजी अयोध्याचा दौरा केला जाणार आहे. त्याच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या बाजूने साध्वी कांचनगिरी या उभ्या राहिलेल्या असून त्यांनी बृजभूषण सिंह यांना आव्हान दिले असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच पत्र लिहले आहे. “राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत येतीलच. त्यांना या ठिकाणी येण्या[येण्यापासून कोण रोखतय ते मी बघेनच. त्यांना संत-साधुंचा पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बृजभूषण सिंह यांना विरोध करण्यापासून रोखावे, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली.

साध्वी कांचनगिरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट बृजभूषण सिंह यांना थेट आव्हानच दिले. त्या म्हणाल्या की, राज ठाकरे अयोध्येत आल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी त्यांना विरोध केल्यास त्यांना माझ्यासह साधुसंतांचा सामना करावा लागेल. राज ठाकरे हे हिंदुत्वासाठी काम करत आहेत. त्यांना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.

कांचनगिरी यांनी घेतली होती कृष्णकुंजवर राज यांची भेट

राज ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या साध्वी कांचनगिरी या जेव्हा मुंबईतआलुआ होत्या त्यावेळी त्यांनी राज ठाकरे याचाही त्यांच्या कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी कांचनगिरी यांनी राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले होते. आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यानंतर साध्वी कांचनगिरी त्यांच्यापाठीशी ठामपणे उभ्या आहेत.

Leave a Comment