हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 आता माध्यवधीत आली असून अव्वल 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघामध्ये चुरस लागली आहे. आयपीएल मध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा धाक प्रत्येक संघाला असतो. या खेळाडूंमध्ये असलेली एकहाती सामना फिरवण्याची क्षमता, प्रत्येक संघासाठी टेन्शन आणणारी असते. त्यामुळेच एकतर या खेळाडूंनी लवकर बाद व्हावे किंवा खेळूच नये अशीच अपेक्षा प्रतिस्पर्धी संघांची असते. अशीच एक प्रतिक्रिया किंग्ज ईलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने दिली असून राहुलने थेट विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्सवर बंदी घालावी असेच म्हटले आहे.
विराट -डीव्हिलियर्स यांच्याकडे आयपीएलमधील सर्वोत्तम जोडी म्हणून बघितलं जाते. दोघांनीही आरसीबीला अनेक सामने आपल्या जोरावर जिंकून दिले आहेत. यंदाच्या सत्रात आरसीबी चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते सध्या तिसऱ्या स्थानी आहेत. आरसीबीच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा असतो.
बुधवारी झालेल्या इन्स्टाग्राम चॅटदरम्यान किंग्ज ईलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने कोहली- डीव्हिलियर्स बद्दल असलेली भिती व्यक्त केली आणि मस्तीमध्ये त्याने या दोन्ही खेळाडूंवर बंदी घालावी असे म्हटले. या चॅटदरम्यान कोहलीने राहुलला प्रश्न केला होता की, ‘टी-२० किंवा आयपीएलमध्ये काय बदल करायला पाहिजे असं वाटतं?’ यावर राहुलने मस्करीमध्ये उत्तर दिलं की, ‘आयपीएल आयोजकांनी विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांना बॅन केले पाहिजे.’राहुलने कोहलीला उत्तर दिले की, ‘सर्वात पहिले मला वाटतं की, आयपीएलला मी सांगेन की, त्यांनी तुम्हाला आणि एबी डीव्हिलियर्सवर पुढील वर्षासाठी बंदी घालावी. एकदा की धावांचा एका विशिष्ट पल्ला गाठला की, लोकांनी सांगितले पाहिजे की, आता बस झालं. एकदा की तुम्ही ५ हजार धावा पूर्ण केल्या की खूप झालं. आता तुम्ही इतर खेळाडूंना काम करायला दिले पाहिजे.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’