मोदी सरकारच्या बेरोजगारी भत्ता योजनेतून युवकांना महिन्याकाठी मिळणार 6 हजार रुपये ; नेमकं सत्य जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम केले जात आहेत. नुकतेच सरकारकडून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत नोकरीही दिली. Berojgari Bhatta Yojana हि अशी योजना असून त्यातून महिन्याला बेरोजगार युवकांना ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार असल्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक लिंकही देण्यात आली आहे. जाणून घेऊया या योजेमागचे आणि व्हायरल पोस्टमागचे नेमके सत्य काय आहे ते…..

सध्या सोशल मीडियात वेगाने फिरत असलेल्या बेरोजगार भत्ता योजने मागील बाबत शासनाने स्वतः युवकांना सावधान केले आहे. युवकांनी अशा प्रकारच्या योजनेवर विश्वास ठेऊ नये असे सांगितले आहे. सध्या बेरोजगार भत्ता योजनेची सोशल मीडियावर फिरतात असलेली पोस्ट हि फेक असून ती खोटी आहे. तसेच चुकूनही या पोस्टमधील देण्यात आलेली लिंक उघडू नये, अशी विनंती शासनातर्फे करण्यात आली आहे.

लिंक ओपन केल्यास उडणार बँक खात्यावरील पैसे

सध्या बेरोजगार भत्ता योजनेच्या अंतर्गत अनेक युवकांची फसवणूक झाली आहे. तरीही या योजनेची पोस्ट आणि त्यातील लिंक आपण ओपन केल्यास तत्काळ आपल्या बॅँकेचे डिटेल्स संबंधित लिंकला जोडले जातात. आणि त्यातउन आपले आपोआप बँक खाऱ्यावरील पैसे कट होतात. याबाबात पीआयबी ने आक ट्विटर पोस्ट कार्टून माहितीही दिली आहे.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1600422677457829891?s=20&t=bVJHfiMLaO0QjO9hfHaQig

PIB चे नेमके ट्विट काय?

पीआयबीने जे काही ट्विट केले आहे त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की, या व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर कोणीही विश्वास ठेऊ नये. तसेच या मॅसेजमधील लिंक ओपन करू नये. तसेच अशा प्रकारचे मासेज इतरांना पाठवू नये, असे आवाहन पीआयबीने केले आहे.