कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या तरुणाच्या संपर्कात ही महिला आली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यामध्ये या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सदर कोरोना पॉझिटिव्ह महिला ही दिल्लीहून आलेल्या तरुणाची नातलग आहे. रात्री उशिरा हा अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाला.एकीकडे कोल्हापुरातील बहुतांश चाचणी अहवाल निगेटिव्ह येत असतानाचा हा नवीन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. कोल्हापुरात आतापर्यंत एकूण कोरोनाचे ६ रुग्ण झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”