कोरोनामुळे कोल्हापूरी चप्पल व्यवसायाला तब्बल १ हजार कोटींचा फटका; मजुरांवर उपासमारीची वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फॅशन स्टेटमेंट म्हणून कोल्हापुरी चप्पल हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे. थोरांपासून लहानपर्यंत कोल्हापूर चप्पल वापरायची क्रेज आहे. ज्या कोल्हापूरच नाव संपूर्ण जगात तिच्या सुबक आणि टिकाऊ चप्पलीमुळे पसरले त्या कोल्हापूरातील चप्पल बांधणीचा उद्योग कोरोनामुळे ठप्प पडला आहे. कोल्हापूरातील व्यावसायिकांच्या मते लॉकडाऊन लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १ हजार कोटींचा फटका कोल्हापुरी चप्पल उद्योगाला बसला आहे.

कोल्हापूरसह परिसरातील सुमारे छोटे-मोठे १० हजार पेक्षा अधिक कलाकार, मजूर, कारागीर, व्यापाऱ्यांना हे नुकसान सहन करावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे चप्पल बांधणीच काम पूर्णपणे बंद आहे. जागतिक दर्जाच्या या ब्रँडवर अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होती. मात्र हा ब्रॅंडच आता अडचणीत आल्याने त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलीय. तर जगभरातून होणारी मागणी ठप्प झाल्याने व्यवसायिक सुद्धा अडचणीत आलेत. त्यात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढल्यानं या व्यवसायावर पोट भरणारे हजारो मजुरांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment