कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळला. शहरातील ऐतिहासिक बिंदू चौकात आज CAA आणि NRC कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीसह इतर संघटनांनी पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शविला आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबत तैनात केला होता.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या अनिल म्हमाणे यांनी संविधानाच्या मूलभूत ढाच्याला अडचणीत आणणारा हा कायदा असल्याचं सांगत मोदी-शहांनी कितीही अरेरावी केली तरी आम्ही लोकशाही मार्गाने लढा देणारच असं म्हणत आपली भूमिका मांडली.
महाराष्ट्र बंदला तुलनेनं कमी प्रतिसाद मिळाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. अनेक व्यापाऱ्यांनी, वाहतूक व्यावसायिकांनी आपलं काम सुरुच ठेवलं होतं. उर्वरित महाराष्ट्रातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशींना ओळखता येते – भाजप नेते कैलाश विजयवर्गीय
#Budget2020: पीएफच्या (PF) नियमात होऊ शकतो मोठा बदल ! ‘या’ लोकांना होईल फायदा
#Budget2020: म्युच्युअल फंडमधून पैसे कमविणाऱ्यांना ‘या’ करातून मिळू शकते सवलत