कोल्हापूर महापालिका सभेत करवाढ प्रस्ताव नामंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर शहर पाणीपुरवठा, परवाना, अग्निशमन विभागासह केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान व पेंढारकर कलादालन करवाढीचा तसेच सवलतीचा प्रस्ताव महापालिका महासभेने नामंजूर केला. एलइडी प्रोजेक्ट राबवणाऱ्या एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेसे लिमिटेड कंपनीला (इइएसएल) काळ्यादीत समावेश करण्याचा ठराव मंजूर केला. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महौपर निलोफर आजरेकर होत्या.

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाचा २५ टक्के पाणीपट्टी करवाढीच्या प्रस्तावासह परवाना, आरोग्य विभाग, अग्निशमन आणि अन्य ‌विभागांनी प्रस्ताव सादर केले होते. स्थायी समितीमध्ये कोणतीही चर्चा न करता प्रस्ताव महासभेकडे पाठवण्यात आले होते. सभेतही कोणतीही चर्चा न करता करवाढीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.