मुंबई प्रतिनिधी | सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकांना पुराच्या पाण्याने हैराण केले असतानाच सरकार अजब फतवे काढून त्यांच्या चिंतेत वाढ करत असल्याचे बघायला मिळते आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशावर चौफेर खरपूस टीका झालेली असतानाच आता सरकारने नवीन नियम पुढे करून पुरग्रस्तांची डोकेदुखी वाढवली आहे.
पुरग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर पूरस्थितीने आधीच लोकांच्या घरात पाणी भरलेले असताना आता त्यांना मदत रूपात मिळणारे पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत उभा करण्याचा सरकारचा डाव आहे का ? असा संतप्त सवाल सर्वत्र विचारला जात आहे. अशाच सरकारच्या या निर्णयाचा देखील निषेद करावा तेवढा थोडाच आहे. कारण पूर परिस्थिती हाताळण्यात सरकार आधीच अपयशी ठरले आहे. अशात नवनवीन निर्णय पुढे करून पुरग्रस्ताना क्रोधीत करण्याचे काम सरकार करत आहे.
दरम्यान आम्ही पूरग्रस्तांना मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याच्या निर्णयाबद्दल सरकारने आता सरावासारव करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही सरकारी मदतीचे पैसे पुरग्रस्तांच्या खात्यात जमा करणार नसून आम्ही ते पैसे त्यांना रोख स्वरूपात देणार आहे असे सरकारमधील नेते खाजगीत सांगू लागले आहेत. नेमके सरकार मदत वाटपात काय करणार आहे हे त्यांनी मदत वाटल्यावरच समजेल. तूर्तास उद्धवा अजब तुझे सरकार या गीता प्रमाणे देवेंद्रा ! अजब तुझे सरकार असे म्हणायला काहीच हरकत नाही.