कोल्हापूरात शिये टोल नाक्याचं छत कोसळल; एका पोलीस कर्मचाऱ्यासह ६ जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरसह शहरा लगत असणाऱ्या ग्रामीण भागात गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा ते शिरोली एमआयडीसी रस्त्यावरील शिये टोल नाक्याचे संपूर्ण छत कोसळले. त्यात एक चारचाकी, आठ दुचाकी मोटारींचे नुकसान झाले. तर एक पोलीस कर्मचारयासह 6 जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

बावड्यातील या टोल नाक्याचे शेड पूर्णपणे खराब झाले होते. ते केव्हा कोसळेल याचा नेम नव्हता. तरीही महापालिकेने ही शेड उतरवून घेतली नव्हती. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे हा टोलनाका जमीनदोस्त झाला. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार चाकीचे व आठ मोटरसायकलचे नुकसान झाले. या टोल नाक्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तासाठी होते. तर एका पोलिसासह सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या मुसळधार जोरदार पावसाचा फटका शिये परिसराला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शिवाय शिये परिसरात असणाऱ्या अनेक घरांची पडझड देखील झाल्याचं वृत्त आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment