कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
गेले काही दिवस कोरोनासंबंधी चिंताजनक बातम्या आपण ऐकत-वाचत आहोत. मात्र या काळातही एक सामाजिक भान असलेली एक पॉझिटिव्ह स्टोरी कोल्हापूरच्या गाढहिंग्लजमधून समोर आली आहे. एकीकडे कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडासुद्धा जाणवत आहे. आशा परिस्थितीत गडहिंग्लजचे नगरसेवक महेश कोरी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
कोरोना व्हायरसमुळे संचारबंदीचे नियम कडक असताना आणि एकमेकांसमोर येण्याचे आव्हान असताना त्यावर मात करत हे शिबीर आदर्शरित्या पार पडले. या शिबीरासाठी रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. रक्तदानासाठी आलेले रक्तदाते प्रत्येकी 3 मीटर अंतरावर थांबून मग नंबर येईल तसे रक्तदानासाठी जात होते अर्थात सोशल डिस्टनसिंग पा ळलं गेलं होतं. संकट काळातही महाराष्ट्राच्या युवकाने जर ठरवले तर तो काहीही करू शकतो हे दाखवून दिलंय. संचारबंदी काळात रस्त्यावर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या युवकांनी जरा यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.