स्कुल व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली ; 11 विद्यार्थी जखमी

सांगली | आष्टा येथे क्लेरमोंट स्कुल ची स्कुल व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळल्याने अकरा विद्यार्थी, ड्रायव्हर व सहाय्यक महिला जखमी झाली. सोमवार सकाळी साडे आठच्या सुमारास आष्टा मर्दवाडी रोडवर मिरजवेस कडून एक पिवळ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगाने पूल संरक्षक दगडाला थटून कॅनॉलमध्ये कोसळली. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी जखमी विद्यार्थ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नाल्यात उतरून अकरा विद्यार्थी, ड्रायव्हर व सहाय्यक महिला मावशी यांना बाहेर काढले.

यामध्ये प्रियांशी संदीप फडतरे वय 11 हिचा उजव्या खांदा फॅक्चर झाले. शरण्या फरफुल्लकुमार खोत सिनियर के.जी. रा. हिला डाव्या हाताच्या मनगटास मार लागला. नंदिनी प्रविणकुमार गायकवाडइयत्ता पहिली हिच्या डोकिस मार लागला. मनस्वी रवींद्र नलवडे सिनियर के जी हिचे डावे हाताचे मनगट व कमरेला मार लागला. तसेच इतर 7 विध्यार्थ्यांना हात, पायास व डोकिस मुकामार लागला. सोबत असलेल्या मावशी वैशाली राजेंद्र झिनगे यांना हात पायास खरचटून मुकामार लागला. चालक ओंकार घेवदे यास हातापायास मुकामार लागून जखमी झाला.

सदर व्हॅन सचिन मिलिंद लांडगे यांची आहे. दरम्यान चालक ओंकार जयवंत घेवदे याच्याविरुद्ध रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व्हॅन चालवून विध्यार्थ्यांना जखमी होण्यास कारणीभूत धरून अभय राजकुमार चौगुले यांनी आष्टा पोलीस ठाणेत फिर्याद दिली आहे. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.