Ration Card : आता घरबसल्या एका क्लिकवर बनणार रेशनकार्ड, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात वन नेशन वन कार्ड सिस्टीम लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड असणे जास्त महत्त्वाचे झाले आहे. हे फक्त स्वस्त रेशन मिळवण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणूनही काम करते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती स्वस्त दरात देशभरात कुठेही रेशन घेऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडे रेशनकार्ड असणे हे आधार आणि पॅन कार्डाइतकेच महत्त्वाचे आहे.

तुमच्याकडे अद्याप रेशन कार्ड नसले तरी घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज करून ते मिळवू शकता. यासाठी सर्व राज्यांनी त्यांच्या वतीने वेबसाइट तयार केली आहे. तुम्ही ज्या राज्याचे आहात त्या राज्याच्या वेबसाइटवर जा आणि रेशन कार्डसाठी अर्ज करा.

रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत
– दारिद्र्यरेषेच्या वर (APL)
– दारिद्र्यरेषेखालील (BPL)
– अंत्योदय कुटुंबांसाठी. अत्यंत गरीब लोकांना अंत्योदय कॅटेगिरीमध्ये ठेवले जाते. ही कॅटेगिरी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे ठरवली जाते. याशिवाय वेगवेगळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तू, त्यांचे प्रमाण वेगवेगळे राहते. ग्रामीण आणि शहरी भागाच्या आधारावर देखील यात फरक असू शकतो.

पात्रता अटी
>> रेशन कार्ड काढण्यासाठी भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
>> व्यक्तीकडे इतर कोणत्याही राज्याचे रेशन कार्ड नसावे.
>> ज्यांच्या नावावर रेशन कार्ड बनवले जात आहे, त्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
>> 18 वर्षाखालील मुलांचे नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट आहे.
>> कुटुंबात कुटुंबप्रमुखाच्या नावावर रेशन कार्ड असते.
>> ज्या सदस्यांचा रेशन कार्डमध्ये समावेश केला जात आहे, त्यांचे कुटुंब प्रमुखाशी जवळचे संबंध असणे आवश्यक आहे.
>> त्यापूर्वी कोणत्याही रेशनकार्डवर कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव नसावे.

यासाठी अर्ज कसा करता येईल ?
• रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
• यानंतर Apply online for ration card ‘या’ लिंकवर क्लिक करा.
• रेशनकार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात.
• रेशन कार्डसाठी अप्लिकेशन चार्ज 05 रुपये ते 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर, फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
• फील्ड व्हेरिफिकेशननंतर, तुमचा अर्ज योग्य आढळल्यास तुमचे रेशन कार्ड तयार केले जाईल.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, सरकारने जारी केलेले कोणतेही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे रेशनकार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात. याशिवाय पत्त्याचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, रेंटल एग्रीमेंट यांसारखे डॉक्युमेंटसही आवश्यक असतील.

नाममात्र शुल्काची तरतूद
रेशन कार्ड मिळविण्यासाठी अर्जदाराला नाममात्र शुल्कही भरावे लागते. यासाठी अर्जदाराला त्याचे राज्य आणि प्रदेश माहित असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये ही फी 5 रुपये ते 45 रुपये आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर, तो फील्ड व्हेरिफिकेशनसाठी पाठविला जातो. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची व्हेरिफिकेशन करते. साधारणपणे ही चाचणी अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत पूर्ण होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. सर्व डिटेल्सचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर रेशन कार्ड तयार होते. कोणतेही डिटेल्स चुकीचा आढळल्यास अर्जदारावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

Leave a Comment