हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान Kotak Mahindra Bank कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. बँकेकडून 390 दिवसांवरून 10 वर्षांपर्यंत कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मात्र हे लक्षात घ्या कि, इतर कालावधीच्या एफडीवर जुनेच व्याजदर लागू होतील.
यानंतर आता Kotak Mahindra Bank कडून 7-14 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के तर 15-30 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.65 टक्के दराने व्याज मिळेल. हतसेच 31 ते 90 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के, 91 ते 179 दिवसांच्या FD वर 3.75 टक्के, 180 ते 363 दिवसांच्या FD वर 5.00 टक्के आणि 364 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याज दिले जाईल. त्याचबरोबर 365 दिवसांपासून ते 389 दिवसांपर्यंत FD वर 5.75 टक्के व्याज मिळेल.
‘या’ कालावधीच्या व्याजदरात बदल
Kotak Mahindra Bank कडून आता 390 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच 23 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर आता 6.10 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर आता 2-10 वर्षाच्या FD वर 6 टक्के व्याज मिळेल. हे लक्षात घ्या की, बँकेकडून 23 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक व्याज दर दिला जात आहे.
कमीत कमी 5,000 ची FD
Kotak Mahindra Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, आता FD सुरू करण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 5,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. हे पैसे निर्धारित वेळेसाठी लॉक केले जातील ज्यावर बँक आधी व्याज देईल. यावेळी बँकेकडून म्हंटले आहे की, ग्राहकांकडे व्याज काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत. बँकेच्या मते, ग्राहकांना मासिक, त्रैमासिक किंवा सकल व्याज पर्याय निवडण्याची सुविधा मिळते.
RBI ने रेपो दर वाढवल्यानंतर व्याजदरात झाली वाढ
गेल्या 4 महिन्यांत RBI कडून रेपो दरात1.40 टक्क्यांनी वाढ झाली. ज्यानंतर, जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. मात्र यामध्ये थोडाफार दिलासा देत बँकांनी FD वरील व्याज दरही वाढवला आहे. अलीकडच्या काळात, आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसहित अनेक बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. याशिवाय आत बँका बचत खात्यावरील व्याजदरातही वाढ करत आहेत. Kotak Mahindra Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html
हे पण वाचा :
Yes Bank कडून नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट FD च्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा!!!
Indian Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ !!! असे असतील नवीन व्याज दर
Equitas Small Finance Bank च्या FD वर जास्त व्याज मिळवण्याची संधी !!!
Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर