Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ

Kotak Mahindra Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील Kotak Mahindra Bank ने ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या सर्व कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (K-MCLR) मध्ये 5 बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता या बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे.

After SBI, Kotak Mahindra Bank Hikes MCLR; Home, Car Loans Likely to go up  | Details Here

Kotak Mahindra Bank च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, आता बँकेचा ओव्हरनाईट MCLR 8.25 टक्के, एका महिन्यासाठीचा MCLR 8.50 टक्के, तीन महिन्यांसाठीचा MCLR 8.65 टक्के, सहा महिन्यांसाठीचा MCLR 8.85 टक्के, एका वर्षासाठीचा MCLR 9.10 टक्के तर दोन आणि तीन वर्षांसाठीचा MCLR अनुक्रमे 9.05 टक्के आणि 9.25 टक्के करण्यात आला आहे. 16 जानेवारी 2023 पासून, कोटक महिंद्रा बँकेचा बेस रेट 7.65% तर ‘बेंचमार्क पीएलआर’ 16.40 टक्के आहे.

Kotak bank raises MCLR by 10 bps | The Financial Express

या बँकानी देखील MCLR मध्ये केली वाढ

ज्या कर्जदारांनी मार्चमध्ये त्यांच्या किरकोळ खर्चाच्या निधीवर आधारित कर्जदरात वाढ केली आहे. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) यांचा समावेश आहे.

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील. Kotak Mahindra Bank

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/stories-in-focus/loans/home-loan/key-differences-between-mclr-bplr-base-rate-and-repo-rate-explained-in-detail.html

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ