कोयना नदीकाठी हाैदोस : चार जेसीबीसह 30 ट्रॅक्टरने तांबडी मातीचा उपसा, प्रशासन झोपेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्याचे तहसीलदारासह महसूल विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनातील अधिकारी कोरोना बाधित असल्याची माहिती असल्याने कोयना नदीकाठी वीट भट्टीसाठी लागणारी तांबडी मातीचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. कराड शहराजवळ असलेल्या मलकापूर शहराच्या हद्दीत वीट भट्टीसाठी तब्बल चार जेसीबी आणि 30 ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसा सुरू आहे. अशावेळी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी झोपेच्या सोंगेत असल्याची चर्चा सुरू आहे.

वीट भट्टीसाठी लागणारी माती उपसा कोयना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नदीकाठी माती उपसा केल्याने अनेक ठिकाणी नदीचे पात्र वाढलेले असून जमिनीचा काही भाग वाहून गेल्याचे चित्र दिसून येते. नदीकाठी मातीच्या उत्खनाने पावसाळ्यात पूरस्थिती लवकर निर्माण होते, तसेच नदीकाठी या माती उपसामुळे फटका बसतो. त्यामुळे महसूल विभागाचे यावर नियंत्रण असते. परंतु तरीही अनेक वीटभट्टी चालक चोरून माती उपसा करतात.

कराडचे तहसिलदार विजय पवार यांच्यासह नायब तहसिलदार आनंदराव देवकर आणि महसूल विभागातील अनेकजण कोरोना बाधित या आठवड्यात आलेले आहेत. प्रशासनाचे अधिकारी कोरोना बाधित आढळल्याने माती उपसासाठी वीट भट्टी चालकांनी चक्क कोयना नदीपात्रात हाैदोस माजवला आहे. कराड जवळील मलकापूर हद्दीत तब्बल 4 जेसीबी आणि 30 ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने माती उपसा सुरू आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवून हे उत्खनन सुरू आहे. यामुळे नदीपात्राची मोठी हानी होत आहे. माती उचलण्यासाठीचा किरकोळ ब्रासचा परवाना घेऊन हजारो ब्रास माती उसपली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment