अशी कोणती जादू घडते की मुख्यमंत्री एकदम ठणठणीत होतात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत एका अँपचे उदघाटन करण्यात आले. यावरून भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. “एका छोट्या ॲपच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात, मार्गदर्शन करतात. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत. 10-12 तासांत काय अशी जादू घडते की त्यांची प्रकृती ठणठणीत होते? तिरस्काराच्या भूमिकेतून पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित राहिले नसावेत, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, एका छोट्या ॲपच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित राहतात, मार्गदर्शन करतात, परंतु प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत. 10-12 तासांत काय अशी जादू घडते की त्यांची प्रकृती ठणठणीत होते? खरंतर राज्याचे मुख्यमंत्री केवळ तिरस्काराच्या भूमिकेतून पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित राहिले नसावेत, असे वाटते.

वास्तविक पाहता हे सरकार अहंकाराने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांना आपल्या अहंकारापेक्षा राज्याचे विषय महत्त्वाचे वाटत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे किंवा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी हजर राहायला हवे होते. परंतु दुर्दैवाने कुणी ही मंत्री राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित नव्हते. हे सरकारला किती जनहिताचे आहे हे यावरुनच दिसून येते, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

Leave a Comment