Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Krishna Bhima River Linking Project-2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्प कामाचे सर्वेक्षण करण्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तसेच या योजनेचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

IRCTC Tour Package : कमी बजेटमध्ये पावसाळ्यात देऊ शकता 7 ज्योतिर्लिंगांना भेट; IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज

नदीजोड प्रकल्पाने १.२५ लाख हेक्टर शेतीला फायदा

Krishna Bhima River Linking Project प्रकल्पामुळे 1.25 लाख हेक्टर शेतीला पाणी मिळेल, अशा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कृष्णा -भीमा खोऱ्यांत कुंभी, कासारी, कडवी, वारणा, कोयना, कृष्णा, निरा धरणे आहेत. पावसाळ्यात ही धरणे भरल्यानंतर नद्यांव्दारे पाणी कर्नाटकात जाते. नद्यांना पूर येतो. धरणक्षेत्र आणि परिसरात अतिवृष्टी झाल्यास महापूर येतो. हे टाळण्यासाठी या खोऱ्यातील नद्यांचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात वळवण्यास तेथील शेतीला मोठा फायदा होणार आहे. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली होती. पाईपलाईनव्दारे नद्या जोडत सायफन पध्दतीने हे पाणी नेता येवू शकते, असेही त्यावेळी ठरले होते. आता उपमुख्यमंत्र्यांनी या कामात लक्ष घालून हे काम तातडीने करण्यावर भर दिला आहे.

पूर नियंत्रण होऊन पिण्याच्या पाण्याचीही सोय (Krishna Bhima River Linking Project)

या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याची सोय होईल तसेच पूरनियंत्रण करता येईल, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे एवढ्यापुरतीच ही योजना मर्यादित नाही तर उर्ध्व कृष्णा खोऱ्यातील ११५ टीएमसी अतिरिक्त पाणी निरा व भिमा खोऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्याला उपलब्ध करुन देता येणार आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण व कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प अशा नावांनी ही योजना ओळखली जाते. कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या ६६६ टीएमसी पाण्यापैकी जवळपास ५०० टीएमसी पाणी महाराष्ट्राने अडविले आहे. उर्वरीत १६६ टीएमसी पाण्यापैकी ११५ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी वापरणे, असा या योजनेचा हेतू होता. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, नगर या सहा जिल्ह्यांना या योजनेतून फायदा होणार आहे.

Monsoon Tourism : भारतातील ‘ही’ ठिकाणे तुम्हाला करुन देतील स्वर्गात आल्याची जाणीव; पावसाळ्यात नक्की भेट द्या

एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून घेणार १५ हजार कोटी

या योजनेबाबत अधिक माहिती देताना फडणवीस यांनी ट्विटद्वारे सांगितले की, 15,000 कोटी किमतीच्या या प्रकल्पाकरीता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर भीमा खोऱ्यातील पिकांसह, सहा जिल्ह्यातील पिकांनाही बारमाही पाणी देणे शक्‍य होणार आहे. योजनेच्या कामाला सुरवात करताना या भागातील पीकरचना दाट करण्याची सूचना केली होती. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेतील खरिपातील शिल्लक पंपिंग क्षमता विचारात घेऊन रब्बी व उन्हाळी हंगामातील नियोजनासाठी साठवण तलावही प्रस्तावित करण्यात आले होते. सरकारने आता ही योजना तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.