क्रिती सेनॉनने शेयर केला सुशांतसिंग राजपूतसोबतच ‘हा’ फोटो; म्हणाली…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा रविवारी राहत्या घरी मृत्यू झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चाना उधाण आले आहे.  सुशांतसिंगच्या अनेक आठवणी त्याचे जवळचे काही लोक तसेच बॉलिवूडमधील कलाकार शेअर करत आहेत. राबता चित्रपटातील त्याची सहकलाकार क्रिती सेनॉनही आता व्यक्त झाली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून तिने सुशांतच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. आणि त्याक्षणी तुझ्यासोबत तुझ्या जवळचे कुणी असते तर खूप बरे झाले असते असेही तिने म्हंटले आहे.

“सुश, मला माहित आहे तुझा तल्लख मेंदूच तुझा सर्वात जवळचा मित्र आणि शत्रूदेखील होता. पण तुझ्या आयुष्यात असा एक क्षण आला ज्यात तुला जगण्यापेक्षा मृत्यू उत्तम वाटला हे समजल्यापासून मी पूर्णतः तुटून गेले आहे. मला असे वाटते, तुझ्या सोबत तुझ्या भूतकाळातील क्षणांचे कुणी असते, मला वाटते तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी तुला असे सोडून दिले नसते. मला वाटते, तुझ्या आतमध्ये जे मोडले होते ते मी ठीक करू शकले असते, मी करू शकले नाही. मला खूप गोष्टी वाटत आहेत… माझ्या हृदयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला आहे… आणि तो नेहमी तुझ्यासोबत राहील. तुझ्या आनंदासाठी प्रार्थना  करणे मी कधीच थांबवले नव्हते आणि पुढेही थांबवणार नाही.” अशी भावनिक पोस्ट तिने केली आहे.

https://www.instagram.com/p/CBfjuqujOnk/?utm_source=ig_embed   

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जर तुला तुझ्या कठिण काळात मदत करणारे लोकं तुझ्याजवळ असते तर हे असे झालेच नसते. ज्या लोकांचे स्वत:वर जास्त प्रेम आहे अशा लोकांना तू का दूर केलं नाहीस असे म्हटले आहे. तिची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.सुशांतच्या निधनानंतर क्रितीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली नसल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. पण आता क्रितीने एक पोस्ट लिहिली आहे. क्रिती आणि सुशांत हे खूप चांगले मित्र-मैत्रीण होते. तसेच क्रितीची बहिण नुपूर सेनॉनने सोशल मीडियावर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. सुशांत आणि क्रितीने ‘राबता’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. पण या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment