हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस ठाकरे गटाला शिंदे गटाकडून धक्के दिले आहेत. विलेपार्ले भागातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मी अजून शिवसेना सोडलेली नाही. दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नाही. मी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी मला मोठी जबाबदारीदेखील दिली आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचे हेगडे यांनी म्हंटले.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हेगडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे गटात कुणावरही माझी नाराजी नाही. शिवसेनेत जाणे ही माझीच चूक होती. सगळेच माझे मित्र आहेत. एअरपोर्ट परिसरात 1 लाख घरं, 5 लाख लोक राहतात, त्यांच्या पुनर्वसनाचं काम होते.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या समर्थकांसह आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पक्षात त्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #BalasahebanchiShivsena pic.twitter.com/D3E3AC37Z4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 28, 2022
विलेपार्लेतील रस्त्याच्या प्रश्न होता तसेच पक्ष संघटनवाढीत भूमिका बजावण्याची माझी इच्छा होती. या प्रमुख अपेक्षा होत्या. एकनाथ शिंदे यांनी या अपेक्षा पूर्ण होण्याचे आश्वासन दिले आहे. मी आमदार होतो. म्हाडाचा संचालक होतो. अनेक वर्षांपासून काम करतोय, त्यामुळे मी फार काही वेगळे करत नाही.