हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं लालूंप्रसाद यादव यांनी म्हंटल.
लालूंप्रसाद यादव यांनी ट्विट करत म्हंटल, आम्ही आणीबाणीचा काळा काळही पाहिला आहे. आम्ही ती लढाईही लढली. आज माझ्या मुली, नातवंड आणि गर्भवती सून यांना भाजप ईडीने बिनबुडाच्या प्रकरणात 15 तास बसवले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? संघ आणि भाजपविरुद्ध माझा वैचारिक लढा आहे आणि राहील. मी त्यांच्यापुढे कधीही झुकलो नाही आणि तुमच्या राजकारणापुढे माझ्या कुटुंबातील आणि पक्षातील कोणीही झुकणार नाही असं म्हणत लालूप्रसाद यादव यांनी आपला संताप व्यक्त केला.
संघ और भाजपा के विरुद्ध मेरी वैचारिक लड़ाई रही है और रहेगी। इनके समक्ष मैंने कभी भी घुटने नहीं टेके हैं और मेरे परिवार एवं पार्टी का कोई भी व्यक्ति आपकी राजनीति के समक्ष नतमस्तक नहीं होगा।
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) March 10, 2023
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना किडनी देणारी त्यांची मुलगी आचार्य रोहिणी यांनी सुद्धा ईडी कारवाईननंतर केंद्र सरकार वर हल्लाबोल केला आहे. तुमची दडपशाही जितकी जास्त असेल तितकं अजून राजद मजबूत होईल. लहान मुलांवर, गरोदर महिलांवरील अत्याचाराची कहाणी म्हणजे लोकशाहीच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. सीबीआय,ईडी हे फक्त बहाणे आहेत, त्यांचा खरा उद्देश समाजवाद्यांना संपवणे हाच आहे असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली.