खळबळजनक! सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भररस्त्यात घातल्या गोळ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावावर गोळ्या झाडल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकारी अमीर हसन यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतचा मावस भाऊ राजकुमार सिंह यांचं मधेपुरा येथे मोटारसायकल शोरूम आहे. मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याचा सहकारी अमीर हसनला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे.

दरम्यान, राजकुमारचा सहकारी अमीर हसनची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.