भारत बाँड ETF सब्स्क्रिप्शन साठी खुले, FD पेक्षा चांगला मोबदला मिळण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून आपल्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय खुला होतो आहे. भारत बॉंड ईटीएफ (Bharat Bond ETF) चे दुसरे सब्स्क्रिप्शन खुले करण्यात आले आहे. याद्वारे सरकारची १४ हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना आहे. हा देशातील हा पहिला बॉंड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे. यामध्ये न्यूनतम युनिट १,००० रुपयांचे आहे. याचे सब्स्क्रिप्शन १७ जुलै ला बंद होणार आहे. याआधी डिसेंबर २०१९ मध्ये भारत बॉंड ईटीएफ सिरीज सादर करण्यात आली होती. याद्वारे १२,४०० कोटी रुपये उभे करण्यात आले होते. ईटीएफ सरकारी कंपन्यांसाठी ‘एएए’ रेटिंग वाल्या बॉंड मध्ये पैसे लावते. या एनएफओ मध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय ५ वर्षात परिपक्व होणारा बॉंड आहे. दुसरा पर्याय १० वर्षात परिपक्व होणारा पर्याय आहे.

५ वर्षाचा बॉंड २०२५ मध्ये आणि १० वर्षाचा बॉंड २०३० मध्ये परिपक्व होईल. याप्रकारे भारत बॉंड ईटीएफ मध्ये ज्या लोकांना ५ अथवा १० वर्षांसाठी पैसे गुंतवायचे आहेत त्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवावे. ईटीएफ ५ वर्षात परिपक्व होणाऱ्या बॉंडचे पैसे सरकारी कंपन्यांवर लावेल. यामध्ये पीएफसी (PFC), आरईसी (REC), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Power Grid Corporation of India), नॅशनल हाउसिंग बँक (National Housing Bank), आयओसी (IOC), नाबार्ड (National Bank for Agriculture & Rural Development), एचपीसीएल (Hindustan Petroleum Corporation), एनएचपीसी (NHPC), एग्जिम बँक (Export Import Bank of India), आईआरएफसी (Indian Railway Finance Corporation), एनटीपीसी (NTPC) आणि न्यूक्लियर पॉवर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Nuclear Power Corporation of India) यांचा समावेश आहे.

१० वर्षात परिपक्व होणाऱ्या बॉंडचे पैसे पीएफसी (PFC), आरईसी (REC), पॉवर ग्रिड कॉरपोरेशन (Power Grid Corporation), नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (National Highways Authority of India), न्यूक्लियर पॉवर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Nuclear Power Corporation of India), आयआरएफसी (Indian Railway Finance Corporation of India), हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (Housing & Urban Development Corporation) आणि एनएचपीसी (NHPC) या कंपन्यांमध्ये लावले जातील. एनएफओ च्या दरम्यान न्यूनतम 1000 रु पासून गुंतवणूक करता येऊ शकते. यानंतर १००० रुपयांच्या गुणाकाराच्या प्रमाणात गुंतवणूक करता येऊ शकते. कमाल २,००,००० रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. संस्थात्मक गुंतवणुकीसाठी किमान २,०१,००० रुपये गुंतवावे लागतील. पुढे त्याच्या गुणाकाराच्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment