भाजप आमदार लक्ष्म जगताप थेट अँम्ब्युलन्समधून विधान भवनात दाखल ; मतदानाचा हक्क बजावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. यादरम्यान पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही थेट रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले होते. त्यानंतर गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव लक्ष्मण जगताप मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. मात्र, ते डॉक्टरांसह रुग्णवाहिकेतून नुकतेच विधानभवनात दाखल झाले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर आमदाराणी देखील त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

गेल्या दीड महिन्यांच्या उपचारानंतर जगताप यांना 2 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना एअर अँब्युलन्समधून नेणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप हे रमुम्बैत दाखल झाले आहेत.

स्ट्रेचरवरुन आमदार मुक्ता टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुण्यातील दोन आमदार हे आजारी असल्याने त्यांच्या मतदानासाठी उपस्थितीवर प्रश्न उपस्थित होत होते. पण पुण्यातील दोन्हीही आमदारांनी मतदान करण्याचा निर्णय घेत विधानभवनात दाखल झाले. ते म्हणजे एक लक्ष्मण जगताप आणि दुसऱ्या मुक्ता टिळक या होय. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठच्या भाजप आमदार आहेत. त्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. मात्र, आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी मुक्ता टिळक यांनी मुंबईत येऊन मतदान करण्याचे ठरवले. त्यानुसार त्या मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर स्ट्रेचरवरुन मुक्ता टिळक यांना विधानभवनात मतदानासाठी नेण्यात आले.

असे आहे आमदारांचे संख्याबळ

भाजप – 106

शिवसेना – 55

राष्ट्रवादी – 53

काँग्रेस – 44

अपक्ष व छोटे पक्ष – 29

Leave a Comment