हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप पक्षावर मुख्यमंत्री पदावरून टोलेबाजी केली जात आहे. या दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक वक्तव्ये केल्याने त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत टोलाही लगावला. “मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. मात्र, शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले. पण त्यांना कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहता आले नाही, असे फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार साहेब मोठेच नेते आहेत. ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरे झाले असते. त्यांनी चांगलंच काम केले असते. मला एका गोष्टीचे समाधान वाटते कि, मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे हे बघून आख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. हीच माझ्या कामाची खरी पोहोच पावती आहे.
LIVE| Interacting with media, #Goa https://t.co/gEIlpHcOq5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 13, 2021
पवारांनी मावळमध्ये झालेल्या गोळी बाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यावर फडणवीस म्हणाले की, जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल डायर गोळीबार करायला गेले नव्हते. पोलिसांनीच गोळीबार केला होता. पण गव्हर्नर जनरलच्या आदेशाने गोळीबार झाला होता. त्यामुळे मावळचा गोळीबाराबाबत सांगायचे झाले तर त्या ठिकाणी राज्यकर्त्यांचे पोलीस उपस्थित होते.