आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर मिळणार Loan, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान 7.5% दराने कर्ज मिळेल. यासह निवडक मॉडेल्सवर त्यांना 100 टक्के ऑन-रोड फायनान्स देण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

होम लोनसाठी स्पेशल फेस्टिव ऑफर्स
SBI ने गृह खरेदीदारांसाठी होम लोनसाठी स्पेशल फेस्टिव ऑफर जाहीर केली आहे. अप्रुव्ड प्रोजेक्ट्समध्ये घरे खरेदी करणार्‍या ग्राहकांना एसबीआय होम लोनवर (SBI Home Loan) कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. तसेच ही बँक चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) आणि लोन अमाउंट असलेल्या ग्राहकांना व्याज दरामध्ये 0.10 टक्के विशेष सवलत देत आहे. हे ग्राहकांनी SBI च्या योनो अॅपद्वारे अर्ज केल्यास त्यांना विशेष 0.5 टक्के सूट मिळेल.

गोल्ड लोन घेणार्‍या ग्राहकांना खास ऑफर
SBI ने गोल्ड लोन (SBI Gold Loan) घेणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ऑफर जाहीर केल्या आहेत. अशा ग्राहकांना किमान 7.5 टक्के व्याज दरावर 36 महिन्यांसाठी गोल्ड लोनची परतफेड करण्याची सुविधा असेल. सध्याच्या संकटात ग्राहकांना परवडणारी कर्जाची उपलब्धता पाहता SBI 9.6 टक्के दराने पर्सनल लोन ऑफर (SBI Personal Loan Offer) देत आहे.

YONO APP वर प्री-अप्रुव्ड पेपरलेस लोनची सुविधा
डि​जिटल बँकिंगची वाढती उपयुक्तता आणि मागणी लक्षात घेता SBI ने YONO APP युझर्ससाठी ऑफर देखील जाहीर केली आहेत. योनो अॅप द्वारे या ग्राहकांना इन-प्रिंसिपल अप्रुवलच्या आधारे कार लोन आणि गोल्ड लोनसाठी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.

प्री-अप्रुव्ड लोनसाठी पात्रता कशी तपासायची?
SBI ग्राहकांना केवळ 4 क्लिकमध्ये योनो अॅपद्वारे प्री-अप्रुव्ड पेपरलेस पर्सनल लोन मिळेल. यासाठी, ग्राहकांनी पहिले त्यांची पात्रता तपासली पाहिजे. प्री-अप्रुव्ड लोनसाठी पात्रता तपासण्यासाठी ग्राहकांना मेसेज बॉक्समध्ये PAPL <space> <last 4 digits of SBI a/c no.> टाइप करून 567676 वर एसएमएस पाठविणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like